Prithvik Pratap Wikipedia

About This Blog
Prithvik Pratap, Wikipedia, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Prithvik Pratap Wikipedia

Biography of Prithvik Pratap Kamble
Profession : Actor & Comedian
Marathi Actress / Actor : 
Name : Prithvik Pratap
Nike Name : निरागस विनोद वीर
Real Name : Prithvik Pratap Kamble
Date of Brith : 30 November
Age : N/A
Birthplace : Mumbai, Maharashtra, India 
Hometown : Vikhroli, Mumbai, Maharashtra, India 
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut Ambat Goad (2018)
School : Mumbai, Maharashtra, India
College : Kirti College of BMM
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Girlfriend : Single
Wife Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : Ambat Goad, Assa Maher Nako G Bai
Movie : Class of 83
Song : 
Web Series :
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Maharashtrachi Hasya Jatra All Cast

  1. प्रसाद ओक
  2. सई ताम्हणकर
  3. गौरव मोरे
  4. वनिता खरात
  5. ओमकार भोजने
  6. प्रसाद खांडेकर
  7. समीर चौगुले
  8. विशाखा सुभेदार
  9. नम्रता संभेराव
  10. रसिका वेंगुर्लेकर
  11. शिवाली परब
  12. प्राजक्ता माळी
  13. निखिल बने
  14. प्रियदर्शनी इंदलकर
  15. नेहा ठाकूर
  16. विराजस जगताप

Prithvik Pratap Date of Birth?

30 November

Prithvik Pratap Age?

N/A

Prithvik Pratap Full Name?

Pruthvik Pratap Kamble

Prithvik Pratap Cast?

N/A

Prithvik Pratap Wife?

Unmarried

Prithvik Pratap Wikipedia

1 thought on “Prithvik Pratap Wikipedia”

  1. प्रिथ्विक नावाचा प्रताप

    महाराष्ट्राची हास्यजत्रा कलाकारांच्या अतरंगी चमुमध्ये प्रिथ्विकचं आगमन कधी झालं, आता आठवतही नाही इतका तो या कार्यक्रमात मिसळून गेला. तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं याबद्दल मात्र दुमत असण्याचं काहीच कारण नाही.
    प्रिथ्विकला मी, प्रथम पाहिलं ते जागो मोहन प्यारे या हास्य मालिकेत, चाळीत रहाणाऱ्या रोहील्या या एका विवाहित तरुणाच्या भूमिकेत. या मालिकेमधला त्याचा वावर, पहाताना त्याच्या अभिनायक्षमतेची कल्पना येत होती. या भूमिकेत तो अगदी फिट्ट बसला.
    तसं पाहिलं तर, प्रिथ्विक हा देखणा, रुबाबदार, भरदार अंगयष्टी या नायकाच्या व्याख्येत कुठेही न बसणारा. बरं प्रेक्षकांना बांधून ठेवणारा आवाजही त्याच्यापाशी नाही. थोडक्यात सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व असूनही, या सगळ्याला न शोभणाऱ्या अनेक भूमिका त्याने हास्यजत्रा मध्ये यशस्वी केल्या आणि एक अभ्यासू अभिनेता म्हणून तो लोकप्रिय झाला, याचं कारण एकसुरी अभिनय करत रहाण्यापेक्षा सतत काहीतरी वेगळं करण्याची आस. आपलं मूळ व्यक्तिमत्त्व, आवाज, शरीरयष्टी यावर मात करत वेगवेगळ्या बाजांच्या भूमिकांचं आव्हान स्वीकारून, भूमिकेचा अभ्यास करून, गेटअप, बोलणं चालणं याचबरोबर दिलेल्या भूमिकेत काही वैविध्य आणून ते पात्र प्रेक्षकांच्या पसंतीला उतरवायचं हा यशस्वी प्रयत्न त्याची प्रत्येक भूमिका पहाताना नेहमीच जाणवतो.
    महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात त्याने आजवर अनेक पात्र रंगवली आहेत.
    प्रिथ्विकची अनेकविध पात्र, भूमिका पहाताना मला दिलीप प्रभावळकर या प्रतिभावान, चतुरस्त्र आणि माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्याची प्रकर्षाने आठवण येते. त्यांनीही आजवर अप्रतिम अभिनयासोबत वेगवेगळे गेटअप, चालण्या बोलण्यातला वेगळा बाज यामधून रंगभूमी, मराठी हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून अनेक भूमिका यशस्वीपणे साकारल्या. दिलीपजींकडेही उत्तम देहयष्टी, देखणं रूप यापैकी काही नसूनही, त्यांनी आपल्या अभिनयप्रतिभेने अनेक भूमिका जिवंत केल्या.
    या निरागस विनोदवीराच्या बाबतीत अगदी हेच म्हणता येईल. त्याचं संवादाचं टायमिंग, चेहऱ्यावर क्षणाक्षणाला बदलत जाणारे भाव, बोलके डोळे, देहबोली आणि विनोदाची नेमकी जाण यामधून तो आपल्या भूमिकेला न्याय देऊन जातो. अनेकदा एखाद्या भूमिकेसाठी तो सर्वार्थाने योग्य आहे किंवा असतो का ? नाही सांगता येत. परंतु आपल्या सगळ्या मर्यादा, उणीवा यावर यशस्वीपणे मात करत तो भूमिकेत शिरतो आणि ते पात्र सहिसही करून जातो…. मग तो,
    शितलीवर प्रेम करणारा आणि आईला घाबरणारा गावातला दुकानदार असो,
    बायकोला घाबरणारा आणि हास्यजत्रेतल्या स्त्री कलाकारांचं नेमकं वर्णन करणारा नवरा असो,
    मुलाखतीसाठी टीव्हीवर आलेला कुणी डॉक्टर असो,
    गावातला मास्तर असो,
    मुलाला ९९% गुण मिळूनही एक टक्का कमी पडला म्हणून चीडचीड करणारा बाप असो,
    बिछान्यावर मरणासन्न पडलेला आणि भजन सुरू होताच, हळुहळू उठून कृष्णाची पोज घेणारा गावातला म्हातारा असो,
    एखाद्या कंपनीचा बॉस असो,
    टिव्ही चॅनलवर आलेल्या पाहुण्यांची मुलाखत घेणारा मुलाखतकार असो,
    विमानातून प्रवास करणारा, अस्खलित इंग्रजी बोलणारा कुणी high profile व्यक्ती असो, अथवा
    आपल्या सिनियर स्त्री इन्स्पेक्टरच्या प्रेमाला नाकारणारा इन्स्पेक्टर असो
    अशा अजून अनेक, विविध बाजाच्या भूमिका करत हास्यजत्रेच्या माध्यमातून आपल्यासमोर येणारा आणि आपल्याला भरपूर हसवणारा प्रिथ्विक नावाचा प्रताप या कार्यक्रमात लीलया वावरतोय, आणि प्रेक्षकांना हास्यासोबत एक वेगळा आनंद आणि समाधान देऊन जातोय हे निःसंशय.
    आज हास्यजत्रेशिवाय प्रिथ्विक वेबसिरिज, यूट्यूब यावरही व्यस्त आहे.
    या प्रतिभावान अभिनेत्याला त्याच्या वर्तमान आणि भविष्यातल्या अभिनय कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा.

    प्रासादिक म्हणे
    प्रसाद कुळकर्णी
    ९७६९०८९४१२

    Reply

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon